पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लुगड्याची गोष्ट

 *लुगड्याची गोष्ट .* रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.   सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग  गरम आहे. ताप येतोय का तुला ? " "आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई "अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव. "आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई. "मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न. " तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....                ज्योतीराव  काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे विचारचक्र सुरु झाले.     लुगड्यासाठी  ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........मग सावित्री असे का बरं बोलली?..........तिच्याकडे एक...