पोस्ट्स

लुगड्याची गोष्ट

 *लुगड्याची गोष्ट .* रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.   सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग  गरम आहे. ताप येतोय का तुला ? " "आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई "अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव. "आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई. "मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न. " तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....                ज्योतीराव  काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे विचारचक्र सुरु झाले.     लुगड्यासाठी  ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........मग सावित्री असे का बरं बोलली?..........तिच्याकडे एक...

त्यागमूर्ति प्रेरणादायी माझी माता रमाई

त्यागमूर्ती प्रेरणादायी माझी रमाई! ... रमाई म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. पददलितांच्या आई, रमाईंचे ‎च्या जयंतीनिमित्त रमाईंना विनम्र अभिवादन... ... महामानव डॉ. बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी शोषलेल्या गरिबीच्या चटक्यांचा, प्रसंगी आपल्या ईच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही. रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब महार कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांना प्रेमाने रामी म्हणायच्या. रमा लहानपणापासूनच खूप समझदार, प्रेमळ आणि घरकामात खूप हुशार होत्या. बालपणीच त्यांचे आई-वडिल मरण पावले. लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली रमा तिच्या भावंडासोबत मामाकडे मुंबईला राहायला आली. त्या काळामध्ये अगदी अल्पवयात लग्न व्हायची. रामजी सुभेदार यांनी भिवासाठी रमाची निवड केली. रमा...

रेकी चिकित्सा

रेकी चिकित्सा प्रगति पर रेकी -एक आध्यात्मिक अभ्यास पद्धति है[1] जिसका विकास १९२२ में मिकाओ उसुई ने किया था। यह तनाव[2]और उपचार संबंधी एक जापानी विधि है[3], जो काफी कुछ योग जैसी है। मान्यता अनुसार रेकी का असली उदगम स्थल भारत है। सहस्रों वर्ष पूर्व भारत में स्पर्श चिकित्सा का ज्ञान था। अथर्ववेद में इसके प्रमाण पाए गए हैं। यह विद्या गुरु-शिष्य परंपरा के द्वारा मौखिक रूप में विद्यमान रही। लिखित में यह विद्या न होने से धीरे-धीरे इसका लोप होता चला गया। ढाई हजार वर्ष पहले बुद्ध ने ये विद्या अपने शिष्यों को सिखाई जिससे देशाटन के समय जंगलों में घूमते हुए उन्हें चिकित्सा सुविधा का अभाव न हो और वे अपना उपचार कर सकें। भगवान बुद्ध की 'कमल सूत्र' नामक किताब में इसका कुछ वर्णन है।[4] यहाँ से यह भिक्षुओं के साथ तिब्बत और चीन होती हुई जापान तक पहुँची है। जापान में इसे पुनः खोजने का काम जापान के संत डॉक्टर मिकाओ उसुई ने अपने जीवनकाल १८६९-१९२६ में किया था।[2] इसकी विचारधारा अनुसार ऊर्जा जीवित प्राणियों से ही प्रवाहित होती है। रेकी के विशेषज्ञों का मानना है कि अदृश्य ऊर्जा को जीवन ऊर्जा या की कहा...
इमेज
*डॉ.ए.पि. जे.अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय* पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर नागरिकत्व : भारतीय राष्ट्रीयत्व : भारतीय धर्म : मुस्लीम पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न वडील : जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. अनुक्रमणिका १. शिक्षण २. कार्य ३. गौरव ४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द ५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके ६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके ७. संदर्भ *शिक्षण* त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ...

सामाजिक न्यायाचे प्रेरणास्त्रोत:राजर्षि शाहू महाराज

*सामाजिक न्यायाचे प्रेरणास्त्रोत: राजर्षी शाहु महाराज* राजर्षी शाहु महाराज यांचे नाव म्हणजे सामाजिक न्यायाचे ज्वलंत उदाहरण होय. जातीव्यवस्थेने बरबटलेल्या समाजामध्ये समता व सामाजिक न्यायांची संकल्पना नष्ट झालेली होती. जातीय उतरंडीखाली सामाजिक न्याय दबला गेला होता. एक जात एका जातीच्या डोक्यावर बसुन दुसऱ्या जातीला दाबण्यात धन्यता माणत असे. धर्माचा आणि जातीचा ठेवा ज्या ठेकेदारांकडे होता त्यांच्या कडे न्यायीक भावना च नव्हती. जातीच्या उतरंडीचा फायदा स्वतः चे पातर मिळवण्यासाठी केला जात होता. बहुजन समाजाला संपत्ती, सत्ता, विद्वत्ता, आणि सामाजिक न्याय नाकारून गुलामीची जिवन जगावे लागत असे. गायीला भाकर, मुंगीला साखर आणि माणसाला चाकर समजणाऱ्या लोकांकडे माणुसकी व माणवता आहे असे म्हणने म्हणजे स्वतः च गुलामीच्या बेडीत अजून जखडत जाणे होय. लोकांना जातीचे धर्मात विभागुन मानसिक दहशतवाद निर्माण करण्याचे काम या व्यलस्थेने केले. भिती पोटी लोकांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य कधी मागितले नाही, माणसाने मानबाला स्पर्श केला तर विटाळ होतो अशी दहशत निर्माण करून भितीची वातावरण निर्माण केले. अज्ञानामुळे दारीद्र्य ...

सुंदर सकाळ:चमत्कारिक पहाट

*🌅 चमत्कारीक पहाट!🌄* तुम्ही सकाळी किती वाजता उठता? झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज मी पाच वाजता उठतो! मोठी माणसं सांगायची, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !” आणि ते खरं आहे, हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता, यातुन बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? “हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल” या चामत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं! पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का? इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्णा...

गुरुजन ह्रदय संमेलन

इमेज
गुरुजन ह्रदय संमेलन उत्स्फूर्त पणे शानदार  सुरुवात । -गजानन कोले पत्रकार   'प्रारंभी माणसाने माणसाशी'  या प्रार्थनेने संमेलनाची सुरुवात झाली.मा. राजेंद्र चोरगे बालाजी ट्रस्ट सातारा यांनी प्रथम सत्रामध्ये आपले बहुमोल मनोगत व्यक्त केले, -एक रिक्षा ड्रायव्हर,वडापाव विकणारा मुलगा ते बालाजी ट्रस्ट गुरुकुल शाळा तसेच सातारा येथील  आधुनिक स्मशानभूमी , सातारा येथील भव्य क्रीडांगण बांधकाम बाबत थक्क करणारा प्रवास विशद केला. दुसऱ्या सत्रामध्ये हेरंब कुलकर्णी यांनी वंचितांचे शिक्षण यावर सुंदर विचार प्रगट केले ,शिक्षण व्यवस्था कशी बदलेल यांचा विचार करत आहे,शाळा शिक्षण बदलत नाही ,शैक्षणिक क्रांती केली पाहिजे, खासगी करण बाबत विचार केला पण सगळीकडे एकच .आकार बदलण्याचे करून पाहिले पण घडत नाही.भवितव्यासाठी काय करतानाही.शिक्षकावर लक्ष देणे गरजेचे आहे प्रत्यक्ष शिकवणारे शिक्षक कमी दिसले.कंटाळवाणी नोकरी कशी प्रेरणादायी बनवावी याचे मंथन व्हावे .शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधी वयाचा गॅप आहे तो शिक्षकांनी  त्यांच्या समान होऊन भरून काढला पाहिजे.,शिकवण्यासाठी भाग कमी आहे,वैविध्यपूर्ण ...