सामाजिक न्यायाचे प्रेरणास्त्रोत:राजर्षि शाहू महाराज


*सामाजिक न्यायाचे प्रेरणास्त्रोत: राजर्षी शाहु महाराज* राजर्षी शाहु महाराज यांचे नाव म्हणजे सामाजिक न्यायाचे ज्वलंत उदाहरण होय. जातीव्यवस्थेने बरबटलेल्या समाजामध्ये समता व सामाजिक न्यायांची संकल्पना नष्ट झालेली होती. जातीय उतरंडीखाली सामाजिक न्याय दबला गेला होता. एक जात एका जातीच्या डोक्यावर बसुन दुसऱ्या जातीला दाबण्यात धन्यता माणत असे. धर्माचा आणि जातीचा ठेवा ज्या ठेकेदारांकडे होता त्यांच्या कडे न्यायीक भावना च नव्हती. जातीच्या उतरंडीचा फायदा स्वतः चे पातर मिळवण्यासाठी केला जात होता. बहुजन समाजाला संपत्ती, सत्ता, विद्वत्ता, आणि सामाजिक न्याय नाकारून गुलामीची जिवन जगावे लागत असे. गायीला भाकर, मुंगीला साखर आणि माणसाला चाकर समजणाऱ्या लोकांकडे माणुसकी व माणवता आहे असे म्हणने म्हणजे स्वतः च गुलामीच्या बेडीत अजून जखडत जाणे होय. लोकांना जातीचे धर्मात विभागुन मानसिक दहशतवाद निर्माण करण्याचे काम या व्यलस्थेने केले. भिती पोटी लोकांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य कधी मागितले नाही, माणसाने मानबाला स्पर्श केला तर विटाळ होतो अशी दहशत निर्माण करून भितीची वातावरण निर्माण केले. अज्ञानामुळे दारीद्र्य घरात नांदत होते. मानसिक गुलाम होते विकासाचे माध्यमे बंद होते अशा परिस्थिती मध्ये सुद्धा दान दक्षिना मात्र सुरू होत्या याला मानसिक दहशतवाद नाही तर काय म्हणावं? आमचे चांगले होईल आम्हाला चांगले दिवस येतील या उद्देशाने लोकांनी सुद्धां चाकरी स्विकारून वागत गेले. ना आमचे चांगले दिवस आले ना स्वातत्र्य मिळाले. परंतु जातीव्यवस्था, अंधविश्वासाचे थोतांड, सामाजिक विषमता याला झुगारून मानसाला माणसात आणण्यासाठी काम करणारे राजर्षी शाहु महाराज हे बहुजन समाजासाठी वरदान ठरले. शाहु महाराज यांच्या मुळे जातीच्या उतरंडी खाली दबलेला सामाजिक न्याय आता मोकळा झाला होता. जात बघुन नाही तर माणुस बघुन न्याय आणि कर्म बघुन शिक्षा देणारे राजे खऱ्या अर्थाने राजर्षी ठरतात. बहूजन समाजाचा आवाज म्हणजे राजर्षी शाहु महाराज. मनुस्मृती ने बोलण्याचा अधिकार नाकारला असताना शाहु महाराज यांच्या राज्या मध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार होता. शाहु महाराज यांच्यावर आजही लिखाण आणि प्रबोधन होताना फक्त आरक्षणाचे जणक एवढाच उल्लेख होऊन शाहु महाराजांचे खरे व कणखर कामावर आजही पडदा टाकला जातो. राजर्षी शाहु महाराज यांना अजुनही घराघरात पोहचू न देण्याचे षडयंत्र ही व्यवस्था करत आहे. आपण सुरवात आरक्षणापासुनच करू बहुजन समाजाला आरक्षण देणारे राजर्षी शाहु महाराज हे आद्य क्रांतीकारक सुद्धा आहेत. राजर्षी शाहु महाराज यांच्या दरबारामध्ये नव्वद उच्चपदवार ब्राह्मण होते त्यामध्ये एकही ब्राम्हणेत्तर व्यक्ती नव्हता. शाहु महाराज यांनी उच्च पदावरून ब्राम्हणांची संख्या कमी करून अस्पृश्य व इतर मागासवर्गीय लोकांना त्या पदाचा पदभार दिला. ब्राम्हणेत्तर लोकांना ब्राम्हणांसोबत त्याच पदावर काम करण्याण्याची संधी म्हणजे ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेला सुरूंगच होता. म्हणून अनेक ब्राह्मण शाहु महाराज यांच्या वर नाराज तर झाले पण विरोधातही गेले. अनेक ब्राम्हणांचा विरोध शाहु महाराज यांना पत्कारावा लागला. माझ्या राज्यामध्ये कोणताही भेदभाव, स्पृश्य अस्पृश्यता चालणार नाही प्रत्येकाने प्रत्येकासोबत मानविय कृत्य करायचे असा आदेशच शाहु महाराज यांनी काढल्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि शाहु महाराज हे खूप मोठे संकट ब्राम्हणांना वाटायला लागले. ब्राह्मण आणि ब्राम्हणतेर लोक एकाच छताखाली एकाच पदावर कामावर नियुक्त करून खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची क्रांती राजर्षी शाहु महाराज यांनी केली. ते एवढे करूनच थांबले नाहीत तर आपल्या राज्यामध्ये पन्नास टक्के ब्राम्हणतेर लोकांना आरक्षण देऊन बहूजन समाजाला प्रतिनिधित्व बहाल केले. जेथे शंभर टक्के ब्राह्मण असायचे तेथे पन्नास टक्के बहूजन काम करू लागले. या आरक्षणामुळे बहुजन समाजाला बोलता आले, संपत्ती व सत्ता मिळवता आली. पण हे तत्कालीन ब्राम्हणांना पटणारे नव्हतेच. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व व सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे हि बाब आजही लोकांना कळण्या पलीकडे आहे. जातीव्यवस्था व थोतांड झुगारुन शाहु महाराज यांनी लोककल्याणाचे काम केले बहुजन समाजाचे मागास राहण्याचे कारण म्हणजे शिक्षण आहे याची जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी शाळा व शिक्षणाला महत्त्व दिले. बहूजन समाजाला एका छताखाली शिक्षणाची व्यवस्था निर्माण करून शिक्षणांची संधी उपलब्ध करून दिली. अस्पृश्य व मराठा लोकांच्या मुलांना शिक्षणासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नाही म्हणून बोर्डींग अर्थात वसतीगृहाची निर्मिती केली. शिक्षण संस्थाना चालना देऊन फक्त ब्राम्हणांना च शिक्षणाचा अधिकार नाही तर बहूजन सामाजाला सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे म्हणून त्यांनी या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी संधी निर्माण करून दिली हिच संधी सामाजिक न्यायाचे खुप मोठे उदाहरण आहे. बहुजन समाजाला शिक्षण घेता येत नाही पण ब्राम्हणांना घेता येते यामध्ये सामाजिक न्याय कुठेच आढळून येत नाही. परंतु शाहु महाराज यांच्या मुळे ब्राम्हण शिकु शकतात तर बहुजन समाजाने सुद्धा मागे राहता कामा नये हा झाला न्याय. छत्रपती शाहु महाराज यांच्या विषयी खुप काही माहिती अजूनही समोर आलेली नाही जेवढी आली तेवढी माहिती समाजात पेरली गेली नाही. आजही जातीव्यवस्थेने बटबटलेले लोक आहेत. म्हणून शाहु महाराज यांना घरात सुद्धां घेतले नाही. कणखर बाना आणि निर्भिड निर्णयामुळे शाहु महाराज बहुजन समाजाचे आधार वड ठरलेले आहेत. गंगाधर कांबळे नावाच्या अस्पृश्य माणसाला विहिरी वर पाणी का पितो म्हणुन ब्राम्हणांनी मारले. शाहु महाराजांना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा खुप चिड आली. लगेच शाहु राजांनी तात्काळ गंगाधर कांबळे यांना हॉटेल सुरु करून दिले. त्या हॉटेलला सुधारक नाव दिले. ज्या ब्राम्हणांनी गंगाधर कांबळे यांना मारले होते तेच ब्राह्मण शाहु राजांच्या दरबारात कामाला होते. शाहु महाराज बाहेर जाता वेळेस सुधारक हॉटेलसमोरूनच ये जा करत असत जाता येता गंगाधर कांबळे यांच्या हॉटेलमध्ये थांबुन चहा पाणी पिऊनच समोर जात असत. चहा पाणी पिण्यामध्ये ते ब्राम्हणही असत ज्यांनी गंगाधर कांबळे यांना पाणी पिले म्हणून मारले होते. परंतु शाहु महाराज यांच्या मुळे ज्यांनी गंगाधर कांबळे यांना मारला त्यांनाच गंगाधर कांबळे यांनी पाणी आणि चहा पाजला. हि क्रांती नाही तर काय आहे. हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मँट्रीक पास झाले म्हणून एका राजाने मँट्रीक पास झालेल्या मुलाच्या घरी जाऊन प्रोत्साहन व पुढील शिक्षणासाठी मदत करून मुलांचे भविष्यच नाही तर भविष्यासाठी महापुरुष घडविणारे राजे म्हणजे राजर्षी शाहु महाराज. बहूजन समाजातील लोकांनी व्यवसाय, शिक्षण, कला यामध्ये प्राविण्य मिळवून नाव लौकिक करावे म्हणून शाहु महाराज अग्रेसर होते. फक्त बोलण्यात सामाजिक न्याय नाही तर कर्तत्वात सामाजिक न्याय असणारे शाहु महाराज होत. अस्पृश्य लोकांच्या घरी जाऊन ते खातात तीच मिरची भाकर खाणारे, रोगराई मध्ये प्रत्येकाला भेट देणारे माणसामध्ये कोणताही भेद न करणारे राजर्षी शाहु महाराज खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे जनक ठरतात. बहुजन समाजासाठी काम करताना शाहु महाराज यांना मारण्याचे नियोजन देखील सामाजिक न्याय मान्य नसलेल्या ब्राम्हणांनी केले. परंतु कोणत्याही संकटाना न भिता बहूजन समाजाच्या सोबत राजाश्रय म्हणून उभे राहणारे राजर्षी शाहु महाराज खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे प्रतिक ठरतात. राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्ताने बहुजन समाजास मनपुर्वक सदिच्छा व शाहु महाराज यांना मानाचा मुजरा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुंदर सकाळ:चमत्कारिक पहाट

लुगड्याची गोष्ट