आयुका भेट पुणे


       





                               


                             @गजानन कोले पत्रकार हेरले


                                           9146739999


  माझी आयुका भेट          


       आयुका भेट पुणे एक  विलक्षण व प्रेरणादायी प्रवास .वंदे एज्युकेशन व रिसर्च फौंडेशन इचलकरंजी ने आयोजित केलेली विज्ञान यात्रा म्हणजे विज्ञान यात्रींच्या साठी
 सुंदर अनुभूती.बरंच काही म्हणण्यापेक्षा बरेच शिकवणारी ही प्रात्यक्षिकासह अनुभव देणारी मांदियाळी.


युवा शास्त्रज्ञ धनेश सर यांच्या परिसमय स्पर्शाने व ज्ञानाच्या स्पर्शानं अमृतमय झालेली 60गुरुजनासह न भूतो झालेली विज्ञान यात्रा.दिनांक 13 व 14 नोव्हेंबर19रोजी नियोजित विज्ञानयात्रा एक सुंदर अनुभव देऊन पार पडली.


    अतिशय नियोजनबद्ध व योग्य प्रकारे सांगड घालून विज्ञान यात्रीचे पुरेपूर समाधान होईल अशी दक्षता घेऊन जाणारी ही यात्रा.मी या यात्रेत सहभागी झालो अन खरंच खूप धन्य वाटलं.26 वर्षाच्या सेवेच सार्थक झाल्याचा मनस्वी आनंद झाला.काय सांगावं या विज्ञान यात्रेत जे मिळालं ते भरभरून पण तितकेच स्वतःची जबाबदारी वाढवणार ज्ञान, निश्चितच खूपच प्रेरणादायी.सोबतीला असणारे युवा शास्त्रज्ञ धनेश सर प्रत्यक्ष विज्ञानाचा खजिना जस जसे पुढे जाऊ तसे ज्ञानाचे भांडाराची दारे उलगडत आमचा प्रवास पुणे कडे चालू झाला.प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढवणारी ही विज्ञान यात्रा म्हणजे आमच्यासाठी सुंदर पर्वणीच.अतिशय उत्सुकतेने सहभागी झालेले आमचे सर्व ध्येयवेडे शिक्षक बंधू भगिनी.प्रत्येक जण उत्साहाने व आनंदाने सृजनशील विचाराने सहभागी झालेला.एक नवा विज्ञानयात्री .मी  उत्सुकतेने व जाणून घेण्यासाठी सहभागी झालेला एक सृजक.


       गाडीने पुण्याकडे प्रयाण केलं तसं मनात विज्ञानयात्रा या अनोख्या पण परिचित शब्दाने घर करायला सुरुवात झाली. मन आयुकाच्या भेटीला आतुर झालं.अधीर मन जाहले आयुका भेटीसाठी.सरांचे प्रवास दरम्यान होणारे मार्गदर्शन क्षणाक्षणाला वाढवणारी उत्कंठा .आयुका चा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो.सुरेखा कुंभार मॅडम, टिपूगडे सर,भोई सर यांचा धनेश सरांना नियोजनात असणारा सक्रिय सहभाग.एका विशिष्ट ध्येयाच्या दिशेने टाकलेलं योग्य पाऊल आपल्याला खूप यश देते.अशीच ही माझी आयुका भेट एक प्रेरणादायी विज्ञान प्रवास.अनेक सहली केल्या पण अभ्यासासाठी केलेला हा प्रथमच प्रवास,खूप काही शिकवणारा आनंददायी  प्रवास.विज्ञानयात्रा मधील प्रत्येक कृती ही नवीन काही शिकण्यासाठीच होती. विज्ञान व तंत्रज्ञान युगात प्रत्यकाने अद्ययावत राहणे गरजेचे आहे.या दोन दिवसात जणू काही नाविन्याचा शोध मी घेतला,याची प्रचिती आली.


       विज्ञानाची कास धरू।


        अंधश्रद्धा दूर सुरू।।


   या कवितेतील ओळींची प्रचिती सतत येत राहिली.ज्ञानरुपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, हा भाव सतत मनात राहिला.                                                                      आयुका पुणे(सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे)येथे युवा शास्त्रज्ञशिवम गुप्ता  यांची भेट झाली .अवकाश व ब्रह्माड बदल अतिशय सुंदर माहिती प्रत्यक्ष चित्रफीत दाखवून दिली.युनिव्हर्स वर प्रथम क्लिप दाखवली,निसर्गातील अनेक घटना या मध्ये चित्रित होतें .मानव व निसर्ग यामध्ये सहसंबंध आहे.व्हेनिस गॅलिलिओ चे प्राचीन शहर दाखवले.आकाश गंगा ला मंदाकिनी नाव आहे.गॅलक्षी स्पायरल आहे.15 बिलियन प्रकाशवर्षं आहे.आयुकाच्या शास्त्रज्ञांनी सुपर वलास्टर शोधले आहेत.चंद्राला लुना हे नाव आहे हे त्यांनी सांगितले. प्लूटो ला सर्व शास्त्रज्ञानी आता गृहीत धरले नाही.दुसऱ्या सत्र मध्ये प्रत्यक्ष विज्ञान खेळणी बनवण्याची कार्यशाळा झाली


आयुका चे प्रमुख समीर धुगडे यांनी हि मार्गदर्शन केले .प्रात्यक्षिक कामामध्ये कु शिवानी पेठे हिने अतिशय सुंदर पद्धतीने विज्ञान खेळणी बदल प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.विज्ञान खेळणी करताना प्रत्येक जण आम्ही लहान झालो होतो.आयुका परिसरातील थोर शास्त्रज्ञ आइन्स्टाइन,आर्यभट्ट,न्यूटन, गॅलिलिओ यांच्या प्रेरणादायी पुतळ्यांच्या सानिध्यात खूपच ऊर्जा मिळाली.


         सायंकाळी अवकाश निरीक्षण केले,शनी,शुक्र ,गुरू वत्याचे 3उपग्रह दिसले.चंद्राचे खूप जवळून निरीक्षण केले.अवकाश शास्त्रज्ञांनी खूप सुंदर विवेचन केले.अवकाशातील ग्रहावरील चाललेल्या अंधश्रद्धा बद्दल खूप सुंदर विवेचन झाले.खूप आत्मीयतेने प्रत्येक शास्त्रज्ञ माहिती देत होते.कोणताही अहंकार न ठेवता आमच्या मनाशी समरस होऊन सुंदर शास्त्रीय विवेचन ऐकले मन भारावले.आयुका मध्ये आल्याचे समाधान प्रत्येक क्षणी जाणवत होते.क्षणा क्षणाला मन धनेश सरांचे आभार मानत होते.आयुका भेट खरंच एक प्रेरणादायी प्रवास झाला.


             मानसोपचार तज्ज्ञ डॉ भक्ती वारे यांनी पालक बालक  समाज या वरती सखोल मार्गदर्शन केले.ट्रेटमेंट थेरपी  बद्दल मार्गदर्शन केले.मुले डिप्रेशनमध्ये असतात .याचा अभ्यास आपण केला पाहिजे.मानसिक ग्रोथ वाढवता येते.आई-वडील यांनी पाल्याला जवळ घेणे,शारीरिक गरजा पूर्ण करणे,प्रेम देणे,काळजी घेणे या गोष्टी केल्या पाहिजेत.18वर्षानंतर आपल्याला या सर्वांचे परिणाम जाणवतात.इरेक्शन सायकॉलॉजी आपण पहिली पाहिजे.हे त्यांनी आवर्जून सांगितले.अहंकाराचा वारा लागला तर ओळखलं पाहिजे.आपण इतरांना समजून घ्यायला नेहमी तयार पाहिजे.


       पुणे चिंचवड येथील गुरुकुलम अनाथालय ला भेट दिली ऋषितुल्य गिरीश प्रभुणे काका यांनी  भटक्या फासेपारधी  व इतर  समाजासाठी चालवलेली आश्रमशाळा पाहण्याचा योग्य बालदिना दिवशी आला.मनाला खूप धन्य वाटले. आदरणीय प्रभुणे सर यांनी माहिती दिली .आमच्या आश्रम शाळेत 350 मुले मुली आहेत.इथे फक्त शाळाच नाही तर मुलांना व्यवसाय शिक्षण दिले जाते. .पणती,शिवणकाम,बांबूकाम,मातीकाम,आयुर्वेदिक शिक्षण ,धातू ओतकाम , याचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते.अंधाराच भय नाही शिक्षणाने मनातला अंधार घालवायचा आहे .परिसरात वारली,मधुबानी वारली  चित्र कलेची सुंदर चित्रे  काढली आहेत.मुलांनी स्वतः तयार केलेल वस्तूचा अभ्यासक्रम तयार केला आहे.जवळ जवळ 22 विषय तयार केले आहेत. मुले त्यांच्या स्वतःच्या कला घेऊन येतात,व त्या कलांना अकार देण्याचे काम ही शाळा करते.खूपच सुंदर अनुभूती आली.


         भारतीय हवामान खाते अर्थात पुणे वेधशाळा येथे भेट दिली.मुख्य मार्गदर्शक नाहूश कुलकर्णी सर यांनी खूप सुंदर माहिती दिली.इतर देशांच्या मानाने वैविध्यपूर्ण अशी भूमी भारताला लाभली आहे त्या मुळे खूप सजकतेने हवामाना बद्दल अभ्यास येथे केला जातो.हवामान खात्यांवर होणारी टीका ही इतर खाजगी क्षेत्रातील कंपनी ने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे होते.अतिशय मनमोकळेपणाने प्रत्येक प्रश्नांना उत्तरे दिली.भूकंपयंत्र विभाग पहाता आला.


     अशी ही माझी आयुका भेट मला व माझ्या जीवनाला कलाटणी देऊन  आणि बरंच काही..शिकवून पार पडली.जीवण्याच्या मध्यावर उभे राहून मागे व पुढे पहाताना जीवनाचे सार्थक झाल्याचे जाणवते.माझ्या या आयुका भेट एक प्रेरणादायी प्रवास चिरकाल स्मरणात राहणारा ठरला.या प्रवासात धनेशसर व त्यांचे सर्व सहकारी माझ्या सर्व मित्र परिवाराचे आभार मानावे तितके थोडेच.


       शेवटी एकच म्हणेन "आवो विज्ञान से दोस्ती करे।इस समाज को बेहत्तर बाणाए।


           @गजानन कोले पत्रकार पदवीधरअध्यापक


                       विद्या मंदिर नेज,9146739999


         









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुंदर सकाळ:चमत्कारिक पहाट

लुगड्याची गोष्ट